IND vs IRE, T20I: 'अन् तिथेच आम्ही कमी पडलो', कर्णधार श्रेयस अय्यरने व्हाईटवॉशनंतर दिली कबुली

Shreyas Iyer on India’s 0-2 Shock Loss vs Ireland: भारतीय संघाविरुद्ध आयर्लंडने दुसऱ्या टी२० सामन्यात थरारक विजय मिळवला आणि मालिकाही जिंकली. या निराशाजनक पराभवानंतर भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने स्पष्टीकरण दिले आहे.
Team India

Team India

Sakal

Updated on

IND vs IRE, T20I : भारतीय टी२० संघाला नुकताच मोठा धक्का बसला. रविवारी (२८ जून) आयर्लंडने थरारक दुसऱ्या टी२० सामन्यात भारताला १ धावेने पराभूत केले. त्यामुळे आयर्लंडने बेलफास्टला झालेल्या टी२० मालिकेत २-० अशा फरकाने विजय मिळवला आणि भारताला व्हाईटवॉश दिला. आयर्लंडचा हा भारताविरुद्ध पहिलाच मालिका विजय आहे. यापूर्वी भारतीय संघाविरुद्ध त्यांना कधीही मालिका जिंकता आली नव्हती.

दरम्यान, श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वातील भारतीय टी२० संघाचीही ही पहिलीच मालिका होती. पण त्याच्या कर्णधारपदाला निराशाजनक सुरुवात झाली आहे. तो कर्णधार म्हणून पहिले दोन सामने पराभूत होणारा दुसराच भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी रिषभ पंतच्या नेतृत्वात भारतीय संघ पहिले दोन टी२० सामने पराभूत झाला होता.

Team India
IND vs IRE 2nd T20I : संजू ०, अभिषेक ०... भारतीय संघ संकटात; गोंधळामुळे इशान किशन रन आऊट... JAI MOONDRA पुन्हा चमकला
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com