Shreyas Iyer reaction after India vs West Indies 2nd T20I
esakal
Shreyas Iyer explains why India lost despite scoring 249 runs : भारतीय संघाला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला. २४९ धावा उभ्या केल्यानंतर आपला विजय नक्कीच होईल, असे वाटणाऱ्यांना विंडीजच्या संघाने जमिनीवर आणले. पाहुण्यांनी ६ विकेट्स व ९ चेंडू राखून ही मॅच जिंकली आणि हा त्यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग ठरला. शे होपने ४५ चेंडूंत १०२ धावांची नाबाद खेळी करताना विजयात सिंहाचा वाटा उचलला आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. या पराभवामुळे श्रेयस अय्यरची सलग १० सामन्यांची विजयी मालिका खंडित झाली.