
मंगळवारी (२५ मार्च) पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिल्यांदाच खेळताना गुजरात टायटन्सविरुद्ध ११ धावांनी विजयाची नोंद केली. हा पंजाबचा इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील पहिला विजय ठरला. पंजाबच्या विजयात श्रेयस अय्यरचेही मोलाचे योगदान राहिले. त्याने या सामन्यानंतर त्याची प्रतिक्रियाही दिली.
गेल्यावर्षीचा आयपीएल विजेता कर्णधार राहिलेल्या श्रेयसला आयपीएल २०२५ लिलावात पंजाबने २६.७५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यानंतर त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारीही सोपवण्यात आली. तो पंजाबचा १७ वा कर्णधार ठरला. त्याने पंजाबसाठी पहिलाच सामना खेळताना मैदानही गाजवले.