IND vs NZ, T20I: पहिल्या ३ सामन्यांत लय सापडली, पण शेवटच्या २ मध्ये काय बिनसलं? श्रेयस अय्यर म्हणाला, 'एका गोष्टीत सुधारणा हवी...'

Shreyas Iyer on India's 5th T20I Defeat Against New Zealand: भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या टी२० सामन्यात पराभवाचा सामना लागला. पण भारताने ही मालिका ३-२ अशा फरकाने जिंकली. याबाबत भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रतिक्रिया दिली आहे.
Shreyas Iyer | India A vs New Zealand A

Shreyas Iyer | India A vs New Zealand A

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 5th T20I : रविवारी (१ नोव्हेंबर) भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या आणि अखेरच्या टी२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारताने ईशान किशन (६१) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (५०) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २० षटकात ८ बाद १९१ धावा केल्या होत्या.

न्यूझीलंडसाठी ऍडम मिलनेने कमालीची गोलंदाजी करता ४ विकेट्स घेतल्या. त्यानंतर टीम सिफर्टची ९३ धावांची खेळी आणि ग्लेन फिलिप्सच्या नाबाद ६५ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने १८ षटकातच ३ विकेट्स गमावत १९५ धावा करत हा सामना जिंकला.

Shreyas Iyer | India A vs New Zealand A
IND vs NZ: ईशान किशनने सूर्यकुमारला टाकलं मागे अन् असा पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय
Loading content, please wait...