
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत जिंकली. भारताच्या या विजयात मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने महत्त्वाची भूमिका निभावली. त्याने प्रत्येक सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत मोलाचे योगदान दिले.
तो या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज ठरला. त्याने २ अर्धशतकांसह २४३ धावा केल्या.