Shreyas Iyer is all set to lead India A against Australia A
esakal
इंग्लंड दौरा आणि आशिया कपमधून वगळलेला श्रेयस अय्यर आता भारत अ संघाचा कर्णधार ठरण्याची शक्यता आहे.
IPL मध्ये दिल्ली, कोलकाता आणि पंजाबला फायनलला पोहोचवणाऱ्या अय्यरने 2024 मध्ये KKR ला विजेतेपद मिळवून दिले.
राष्ट्रीय संघात अपेक्षित संधी न मिळाल्यामुळे अय्यरबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.
Shreyas Iyer all set to captain India A : इंग्लंड दौऱ्यानंतर आशिया चषक स्पर्धेसाठीही दुर्लक्षित राहिलेल्या श्रेयस अय्यरला लवकरच मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. श्रेयसच्या नेतृत्वाखाली इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स व पंजाब किंग्स यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. कोलकातानेतर २०२४ मध्ये बाजी मारली. त्याशिवाय श्रेयसने देशांतर्गत क्रिकेटही गाजवले, परंतु त्याला राष्ट्रीय संघात अपेक्षित मान मिळाला नसल्याची खंत, अनेकांनी व्यक्त केली.