Punjab Kings playoff qualification scenario IPL 2026
esakal
Can PBKS still miss playoffs after beating LSG? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये पहिल्या सात सामन्यांत अपराजित राहणारा पंजाब किंग्सचा संघ, प्ले ऑफच्या जागेसाठी संघर्ष करताना दिसतोय. IPL 2026 मध्ये प्ले ऑफचे पहिले तिकीट PBKS पटकावतील असा विश्वास होता, परंतु सलग सहा सामन्यांतील पराभवाने त्यांच्यावर ही वेळ आणली. त्यामुळेच त्यांना विजयासोबतच गणिताची जुळवाजुळव करावी लागत आहे. पंजाबने त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात लखनौ सुपर जायंट्सवर विजय मिळवला, परंतु त्यांचे प्ले ऑफमधील स्थान अजूनही पक्के झालेले नाही. त्यांच्यासाठी रविवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. श्रेयस अय्यरचे ( Shreyas Iyer Smashes Century) या सामन्यातील निर्णायक क्षण ठरला.