India A and Rest of India squads announced
esakal
Shreyas Iyer to captain India A in ODIs vs Australia A: अजित आगरकरच्या निवड समितीने गुरुवारी भारत अ संघाची घोषणा केली. ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध होणाऱ्या तीन वन डे सामन्यासाठी हा संघ खेळणार आहे आणि त्याचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आले आहे. निवड समितीने इराणी चषक स्पर्धेसाठीच्या शेष भारत संघाची घोषणाही केली आहे. भारतीय संघ ३० सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका कानपूर येथे खेळणार आहे. तर इराणी चषकासाठी शेष भारत विरुद्ध विदर्भ यांच्यातला सामना १ ऑक्टोबरपासून नागपूर येथे खेळवण्यात येईल.