Shreyas Iyer is set to play under Suryakumar Yadav's captaincy for Mumbai in the Syed Mushtaq Ali Trophy Super League.
esakal
Shreyas Iyer Mumbai vs Andhra Pradesh match date and time: भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबई संघाकडून खेळताना दिसणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यानंतर मायदेशी परतलेला श्रेयस सुपर लीग गटातील मुंबईच्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. मुंबई संघाला ब गटात स्थान मिळाले असून त्यांचा सामना आंध्रप्रदेशविरुद्ध ३० नोव्हेंबरला नागपूर येथे होणार आहे. या सामन्यात श्रेयस व सूर्या जोडी धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे.