बीसीसीआयने आशिया कप २०२५ साठी जाहीर केलेल्या १५ सदस्यीय संघात श्रेयस अय्यरचा समावेश नव्हता.
राखीव खेळाडूंतही श्रेयसला स्थान न दिल्याने चाहत्यांमध्ये नाराजी पसरली.
पंजाब किंग्जने २६.७५ कोटी रुपये खर्चून श्रेयसला खरेदी करून कर्णधार केले आणि संघाला फायनलमध्ये पोहोचवले.
Shreyas Iyer’s father expressed disappointment: आशिया चषक २०२५ स्पर्धेसाठी बीसीसीआयने १५ सदस्यीय संघ जाहीर केला, परंतु त्यात श्रेयस अय्यरचे नाव नसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी ५ राखीव खेळाडूंचीही नावे जाहीर केली आणि त्यातही श्रेयसचे नाव नव्हते. ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये सातत्याने कामगिरी करूनही श्रेयसला संधी मिळत नसल्याने अनेकांनी टीका केली, तर अय्यरच्या वडिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.