Shubham Ranjane
Sakal
Cricket
T20 World Cup: आजोबा, वडिलांनंतर आता पुण्याचा शुभम आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार; भारताविरुद्ध मैदानात उतरणार
USA’s Shubham Ranjane to Face India: शुभम रांजणे, अमेरिकेच्या संघातील अष्टपैलू खेळाडू, भारताविरुद्ध टी-२० विश्वचषकात खेळणार आहे. त्याचे आजोबा आणि वडील भारतासाठी खेळले होते. तीन पिढ्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची ही दुर्मीळ घटना पाहायला मिळणार आहे.
USA’s Shubham Ranjane to Face India: अमेरिकेच्या संघातील अष्टपैलू खेळाडू शुभम रांजणे, जेव्हा भारताविरुद्ध शनिवारी (ता. ७) टी-२० विश्वचषकाचा सामना खेळायला उतरेल त्या क्षणाची क्रिकेटच्या इतिहासात नोंद होणार आहे. याचे कारण म्हणजे त्याचे आजोबा वसंत रांजणे हे भारतासाठी व नातू अमेरिकेच्या संघातून विश्वचषकात खेळण्याचा हा अभूतपूर्व व दुर्मीळ क्षण असेल.
शुभमचे वडील सुभाष रांजणे यांनीही १९ वर्षांखालील संघातून देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची नवलाई पुण्यातून घडली आहे.

