
भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल कसोटी कर्णधार झाल्यापासून कमालीच्या फॉर्ममध्ये फलंदाजी करतोय. सध्या भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत बर्मिंगहॅममधील एजबस्टन येथे खेळत आहे. या सामन्याचा पहिला दिवस शुभमन गिलने गाजवला आहे. त्याने पहिल्याच दिवशी खणखणीत शतक ठोकलं आहे. यासोबतच अनेक मोठे विक्रम करत दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला बुधवारी (२ जुलै) सुरुवात झाली. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी केएल राहुल २ धावा करूनच माघारी परतला. पण नंतर यशस्वी जैस्वालला करूण नायरने साथ दिली होती. परंतु, करुणही ३१ धावा करू शकला.