
शुभमन गिलच्या कसोटी कर्णधारपदाच्या कारकिर्दीला दणक्यात सुरुवात झाली आहे. मे महिन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी एकापाठोपाठ एक कसोटीतून निवृत्ती घेतली. त्यानंतर शुभमन गिलच्या खांद्यावर भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली.
त्याला ही जबाबदारी मिळाल्यानंतर अनेक चर्चा झाल्या. पण त्याने पहिल्याच सामन्यात त्याचं नाणं पहिल्या दिवशी तरी खणखणीत वाजवलंय. त्याने काही विक्रमही त्याच्या नावावर केलेत.