
बुधवारी (१२ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघात वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना अहमदाबादला खेळला जात आहे. हा सामन्याच्या पहिल्या डावात भारताचा उपकर्णधार शुभमन गिलने मैदान गाजवताना शतक ठोकले आहे.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गिलची कामगिरी नेहमीच चांगली झाली आहे. त्याचाच बुधवारी पुन्हा प्रत्येय आला आहे. गिलने या मैदानात सहज खेळत शतक साजरे केले.