

Rohit Sharma - Shubman Gill
Sakal
Shubman Gill Defends Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाला नुकतेच न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. रविवारी (१८ जानेवारी) इंदोरला झालेला तिसरा वनडे सामना निर्णायक होता. या सामन्यात न्यूझीलंडने ४१ धावांनी विजय मिळवला आणि मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.
न्यूझीलंडने या मालिकेतील पहिला सामना गमावला होता, पण नंतर त्यांनी दमदार पुनरागमन केले आणि सलग दोन विजय मिळवून भारतात पहिल्यांदाच वनडे मालिका जिंकली. भारतीय संघाकडून (Team India) काही स्टार खेळाडूंकडून अपेक्षित कामगिरी या मालिकेत झाली नाही, ज्यामध्ये रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर अशा काही खेळाडूंचा समावेश आहे.