Rohit Sharma was removed and Shubman Gill was pushed into captaincy amid BCCI and selector pressure
esakal
BCCI removed Rohit Sharma and forced Gill as ODI captain : रोहित शर्माला वन डे संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सुरू झालेला वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. दोन दिवसांपूर्वी निवड समिती प्रमुख अजित आगरकर याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या वन डे व ट्वेंटी-२० संघाची घोषणा केली. रोहितकडून कर्णधारपद काढून घेत वन डे संघाचीही सूत्रं शुभमन गिलच्या हाती देण्याचा निर्णय घेतला गेला. २०२७ चा वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला गेला असला तरी रोहित व विराट यांच्या वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.