

TEAM INDIA UPDATE | Shubman Gill Injured, KL Rahul to Lead
Sakal
India vs Sri Lanka XI Warm Up Match Updates: भारतीय कसोटी संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून आजपासून (७ ऑगस्ट) कोलंबोमझ्ये सराव सामना खेळत आहे. भारताचा सराव सामना श्रीलंकन इलेव्हन संघाविरुद्ध होत आहे.
पण या सामन्यासाठी भारताचा कर्णधार म्हणून शुभमन गिलऐवजी (Shubman Gill) केएल राहुल (KL Rahul) नाणेफेकीसाठी आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र यामागचे कारण बीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केले असून भारतीय संघासाठी (Team India) चिंता वाढली आहे.