IND vs WI: शुभमन गिल पहिला ODI खेळणार की नाही? सरावावेळी झालेला जखमी , बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट

Shubman Gill Injury Updates: भारताचा वनडे कर्णधार शुभमन गिल वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेपूर्वी सरावावेळी जखमी झाला होता. त्यामुळे भारतीय संघाची चिंता वाढली होती. आता त्याच्याबद्दल फलंदाजी प्रशिक्षकांनी अपडेट दिली आहे.
Shubman Gill | India vs West Indies

Shubman Gill | India vs West Indies

Sakal

Updated on: 

India vs West Indies, 1st ODI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात तीन सामन्यांची वनडे मालिका रविवारपासून (२७ सप्टेंबर) सुरू होत आहे. पहिला सामना तिरुअनंतपुरम येथे होणार असून दोन्ही संघ तिथे पोहचले आहेत. भारताच्या संघाचे खेळाडू नेट्समध्ये घाम गाळताना दिसत आहेत.

शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघासाठी पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी ही वनडे मालिका महत्त्वाची आहे. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वीच भारताचा कर्णधार शुभमन गिल जखमी झाल्याने भारतीय चाहत्यांची चिंता (injury scare) वाढली होती, पण आता भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक (Sitanshu Kotak) यांनी याबाबत अपडेट दिले आहेत.

Shubman Gill | India vs West Indies
IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कडाक्याचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com