

India Test Team
Sakal
Shubman Gill Mandates Ranji Trophy Stint for India Cricketers: भारतीय क्रिकेट संघाला गेल्या काही वर्षात अनेक चढ-उतार आले आहेत. भारताने काही अविश्वसनीय विजय मिळवले आहे, तर काही निराशाजनक पराभवही स्वीकारले आहेत, विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये.
भारताने (Team India) गेल्या वर्षभरात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात कसोटी मालिकेत व्हाईटवॉश स्वीकारला आहे. त्यामुळे कसोटी कामगिरीत सुधारणा करण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे.
अशात भारतीय संघव्यवस्थानाने काही निर्णय घेतल्याचे समजत आहे. भारताचा कसोटी आणि वनडे कर्णधार शुभमन गिलही (Shubman Gill) भविष्यातील सामन्यांसाठी योजना आखत असल्याचे समजत आहे.