Asia Cup 2025: शुभमन गिल आशिया चषक खेळणार का? ब्लड रिपोर्ट समोर आला, सध्या तो कुठेय?
शुभमन गिलने प्रकृती ठीक नसल्याने दुलीप ट्रॉफीतून माघार घेतली होती.
त्याच्या रक्ताच्या नमुन्याची पुन्हा तपासणी झाली आणि ताजा अहवाल आला.
आशिया चषक २०२५ साठी जाहीर झालेल्या १५ सदस्यीय भारतीय संघात त्याचा समावेश निश्चित आहे.
Asia Cup 2025 India squad latest fitness news : आजपासून सुरू झालेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत उत्तर विभाग संघातून शुभमन गिलने माघार घेतली. त्याची प्रकृती ठिक नसल्याचा निष्कर्ष त्याच्या रक्ताच्या नमुन्यानंतर आलेल्या अहवालातून स्पष्ट झाला. त्यामुळे त्याने दुलीप ट्रॉफी स्पर्धतून माघार घेतली. पण, त्याच्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. शुभमन गिल उप कर्णधार म्हणून पुन्हा ट्वेंटी-२० संघात परतला आहे आणि त्याच्याकडे भविष्याचा कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. अशात त्याचा रक्ताच्या नमुन्याची पुन्हा तपासणी केली गेली आणि रिपोर्ट समोर आला आहे.