
भारतीय क्रिकेट निवड समितीने काही दिवसांपूर्वी भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्वपद २५ वर्षीय शुभमन गिलकडे सोपवले आहे. आगामी इंग्लंड दौऱ्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून ही निवड जाहीर करताना शुभमन गिलला कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले.
रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर गिलच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली आहे. त्यामुळे आताच्या खांद्यावर सौरव गांगुली, अनिल कुंबळे, एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी असणार आहे. या खेळाडूंनी २१ व्या शतकात भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना वेगळा ठसा उमटवला आहे.