
भारताचा क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला इंग्लंडविरुद्ध २० जूनपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. यामालिकेपूर्वीच विराट कोहली, रोहित शर्मा, आर अश्विन हे अनुभवी खेळाडू निवृत्त झाले आहेत. त्यामुळे या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताला नवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात ही मालिका खेळायची आहे.
त्यामुळे या मालिकेला एक वेगळे महत्त्व देखील प्राप्त झाले आहे. याशिवाय भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेतील आपल्या मोहिमेला या मालिकेतूनच सुरुवात करणार आहे.
तसेच शुभमन गिलच्या नेतृत्वाच्या कार्यकाळालाही या मालिकेपासून सुरुवात होईल. त्यामुळे अशा अनेक गोष्टींबद्दल शुभमन गिल माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकसोबत स्काय स्पोर्ट्सवर बोलला आहे.