
भारतीय क्रिकेट संघाला २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका वेगवेगळ्या कारणांनी खास आहे. या मालिकेतून भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेतील मोहिमेला सुरुवात करणार आहेत.
याशिवाय मालिकेपूर्वी रोहित शर्मा, विराट कोहली यांनी कसोटीतून निवृत्ती घेतल्याने शुभमन गिलकडे भारताच्या कसोटी संघाने कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे तो या मालिकेपासून भारताच्या कसोटी कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे.