
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (९ मार्च) खेळवला जाणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना दुपारी २.३० वाजता हा सामना सुरू होणार आहे. वनडे क्रिकेट प्रकारातील वर्ल्ड कपनंतरची सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते.
या स्पर्धेनंतर आता वर्ल्ड कपला अद्याप २ वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे ही स्पर्धा कदाचित भारताचा कर्णधार रोहित शर्मासाठी अखेरच्या वनडे स्पर्धा ठरू शकते, अशी चर्चा आहे. रोहित या स्पर्धेनंतर वनडेतून निवृत्ती घेऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे. यावर आता शुभमन गिलने प्रतिक्रिया दिली आहे.