ICC ODI Rankings 2026: शुभमन गिल पुन्हा नंबर १! रोहित शर्मा, विराट कोहली कितव्या स्थानावर? टॉप २० मध्ये भारताचे पाच फलंदाज

Shubman Gill becomes ICC ODI No.1 batter: भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिल पुन्हा एकदा आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत नंबर १ स्थानावर विराजमान झाला आहे. अनुभवी विराट कोहली आणि माजी कर्णधार रोहित शर्मा कितव्या स्थानावर आहेत, ते पाहा...
Shubman Gill becomes ICC ODI No.1 batter

Shubman Gill celebrating reclaiming the No. 1 spot in the ICC ODI batting rankings

esakal

Updated on

Latest ICC ODI batting rankings 2026: वैभव सूर्यवंशीने ट्वेंटी-२० क्रमवारीत टॉप ५० मध्ये झेप घेतली आणि त्याचवेळी वन डे क्रमवारीत कर्णधार शुभमन गिल पुन्हा अव्वल स्थानावर विराजमान झाला. शुभमनने ८०१ रेटिंगसह वन डे फलंदाजांमध्ये नंबर १ बनला आहे. त्याने न्यूझीलंडच्या डॅरील मिचेल ( ७९४) याच्याकडून हे स्थान हिसकावले आहे. वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान होणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली व रोहित शर्मा यांनी हे स्थान पटकावले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com