
भारत विरुद्ध इंग्लंड संघात ६ फेब्रुवारीपासून वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरला खेळवला जाणार असून त्याआधी मंगळवारी भारताचा उपकर्णधार शुभमन गिल पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता.
त्याने यावेळी त्याच्यावर सोपवण्यात आलेल्या उपकर्णधारपदाच्या जबाबदारीबाबत, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या पराभवाबाबत आणि रोहित शर्माच्या कामगिरीबाबत भाष्य केले.
शुभमन गिलकडे गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या वनडे आणि टी२० संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे.