
सामना खेळत असल्याचे आभासी चित्र निर्माण करून केलेला सराव, गुरू युवराज सिंगची मेहनत आणि विश्वास तसेच ब्रायन लारा यांनी दिलेला सल्ला यामुळे आपल्या खेळात कमालीची सुधारणा झाली आहे. सध्या करत असलेली प्रगती यामुळेच होत आहे, असे मत भारतीय संघातील नवा तारा अभिषेक शर्मा याने व्यक्त केले.
वानखेडे स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यात अभिषेक शर्माने डोळ्याचे पारणे फेडणारी अफलातून वेगवान शतकी खेळी साकार केली. चौकारांपेक्षा अधिक षटकार मारत त्याने त्याचा गुरू युवराज सिंगच्या खालोखाल विक्रमांचीही नोंद केली.