IND vs AUS 2nd Test: शुभमन गिल सरावाला लागला, डे-नाईट कसोटीतून पुनरागमन करणार, पण Playing XI मधून कोण बाहेर जाणार?

Shubman Gill returned to practice ahead of IND vs AUS 2nd Test: भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात पर्थ कसोटीतील विजयासह दमदार केली आहे. आता दुसरा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असल्याने गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे. या सामन्यातून शुभमन गिल पुनरागमन करण्याती शक्यता आहे.
India vs Australia
Shubman GillSakal
Updated on

Australia vs India 2nd Test: भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात दमदार केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२५ मधील पर्थला झालेल्या पहिल्याच सामन्यात २९५ धावांनी विजय मिळवला आणि कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

आता दुसरा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असल्याने गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे. या सामन्याला ६ डिसेंबरपासून ऍडलेडला सुरुवात होणार आहे. त्याआधी कॅनबरा येथे भारताला दोन दिवसीय सराव सामना प्राईम मिनिस्टर इलेव्हन संघाविरुद्ध खेळायचा आहे.

हा सराव सामना गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना गुलाबी चेंडूशी जुळवून घेण्यास मदत होणार आहे.

India vs Australia
IND vs AUS : टीम इंडियाचं काही खरं नाही! दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने बोलावला घातक गोलंदाज अन् तितकाच स्फोटक फलंदाज
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com