

Shubman Gill | India vs Sri Lanka Cricket XI
Sakal
IND vs SLC XI Warm up Match: भारतीय क्रिकेट संघाला गेल्या काही दिवसांपासून खेळाडूंच्या दुखापतींनी घेरलं आहे. जसप्रीत बुमराह, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्तीसह अनेक खेळाडू सध्या दुखापतींचा (Injury) सामना करत आहेत, यातच आता भर पडली होती ती भारताचा कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलची (Shubman Gill). मात्र त्याने रविवारी मैदानात पुनरागमन (Comeback) करत भारतीय संघाची चिंता मिटवली आहे.