Shubman Gill has been ruled out of the fifth and final T20I against South Africa in Ahmedabad
esakal
IND vs SA Ahmedabad T20I injury update: लखनौ सामना रद्द झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी मिळाली आहे. भारतीय संघ या मालिकेत २-१ अशा आघाडीवर आहे आणि पाचवा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या अंतिम सामन्यातून ट्वेंटी-२० संघाचा उप कर्णधार शुभमन गिल ( Shubman Gill Ruled Out) याने माघार घेतली आहे. सराव करताना त्याच्या पायाला दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो चौथ्या सामन्यासाठीही उपलब्ध नव्हता.