

Shubman Gill | India Tour of New Zealand
Sakal
Shubman Gill personal net bowlers for New Zealand Tour: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी नुकतेच शुक्रवारी राष्ट्रीय निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दोन्ही मालिका महत्त्वाच्या आहेत. वनडे मालिकेतून सध्या भारतीय संघ आगामी २०२७ वर्ल्ड कपसाठी तयारी करत आहे, तर कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ (WTC 2025-27) स्पर्धेचा भाग आहे.
भारताला WTC 2025-27 च्या अंतिम सामन्याच्या शर्यतीत राहायचे असेल, तर ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. अशात आता भारताचा वनडे आणि कसोटी कर्णधार शुभमन गिलला याची गंभीरता लक्षात आली असून तो या दौऱ्यासातील सामन्यांसाठी खास तयारी करणार आहे.