

Anshul Kamboj - Akash Deep | India Tour of New Zealand
Sakal
India tour of New Zealand: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय (वनडे) आणि कसोटी मालिकेसाठी राष्ट्रीय निवड समितीने भारतीय क्रिकेट संघाची घोषणा शुक्रवारी केली. जसप्रीत बुमराला कसोटी संघात निवडले असून, वनडे मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे. तसेच आकाश दीप आणि अंशुल कंबोज (Akash Deep & Anshul Kamboj) यांचे भारताच्या कसोटी संघात पुनरागमन झाले आहे.
आकाश दीप २०२५ मध्ये अखेरचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. दुखापतीमुळे तो संघाबाहेरच होता. तसेच अंशुल कंबोज यानेही २०२५ मधील इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर तो एकही कसोटी सामना खेळलेला नाही. आता या दोघांचेही भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.