INDIA VS AUSTRALIA FULL SCHEDULE
esakal
India Tour Of Australia 2025: Schedule, Squads & Live Streaming : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आता वन डे क्रिकेटमध्येही 'शुभा'रंग करण्यासाठी सज्ज झाली आहे. कसोटीनंतर आता वन डे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही शुभमन गिलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा पहिलाच दौरा हा ऑस्ट्रेलियाचा असणार आहे. शुभमनच्या मदतीला संघात रोहित शर्मा व विराट कोहली हे दोन्ही सीनियर असले तरी कर्णधार म्हणून तो आपली छाप पाडण्यासाठी तयार आहे. ही टीम इंडियाच्या २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने सुरू झालेली वाटचाल म्हणावी लागेल.