

Shubman Gill
Sakal
England vs India ODI Series: भारताचा वनडे संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून १४ जुलैपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी भारताचा टी२० संघ इंग्लंडविरुद्ध ०-४ फरकाने मालिका हरला आहे. त्यामुळे आता किमान वनडेत भारतीय संघाकडून निराशा होणार नाही, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.
याशिवाय ही वनडे मालिका पुढीलवर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. या मालिकेतून विराट कोहली दुखापतीनंतर (Virat Kohli) पुनरागमन करत आहे, तर रोहित शर्माही (Rohit Sharma) संघाचा भाग आहे. त्यामुळे या वनडे मालिकेकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.