Virat Kohli’s Power-Hitting Show Stuns RCB Camp Ahead of IPL 2026
esakal
Virat Kohli aggressive batting in nets ahead of IPL video: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB ) आणि भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये जेतेपदाचा बचाव करण्यासाठी सज्ज झाला आहे. १७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर RCB ने मागील पर्वात आयपीएल जेतेपद पटकावले, पण त्यांच्या या उत्साहाला दुसऱ्याच दिवशी गालबोटही लागले. एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत ११ चाहत्यांना जीव गमवावा लागला. त्यामुळेच यंदाच्या पर्वात बंगळुरूच्या स्टेडियमवर सामने खेळवण्यापूर्वी बऱ्याच अटी व शर्थी ठेवल्या गेल्या आहेत. याच मैदानावर RCB पहिला सामना २८ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. विराटने यासाठी जोरदार तयारी केली आहे.