
बांगलादेश संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिला सामना अनिर्णित राहिला होता. पहिल्या सामन्यात बांगलादेशने दोन्ही डावात दमदार खेळ केला होता. पण आता दुसऱ्या सामन्यात श्रीलंका पलटवार करताना दिसत आहे.
बुधवारी (२५ जून) सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवस अखेर श्रीलंकेने मोठ्या आघाडीकडे वाटचाल केली आहे. तसेच पाथम निसंकाही दीडशतकाच्या जवळ आहे.