SL vs BAN 2nd Test highlights and bowling performance
बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या कसोटीत धावांचा पूर आलेला पाहायला मिळाला. बांगलादेश संघाने दोन्ही डावांत मिळून जवळपास ७५० धावा चोपल्या. पण, त्याच बांगलादेशला यजमान श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीत जागा दाखवली. श्रीलंकेच्या गोलंदाजांच्या माऱ्यासमोर बांगालदेशचे फलंदाज ढेपाळले. एकालाही साधी फिफ्टी करता आली नाही.