
SMAT 2024 Semi-Final Schedule : सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या व पृथ्वी शॉ हे स्टार खेळाडू उद्या एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दोन्ही लढती शुक्रवारी बंगळुरू येथे खेळवल्या जाणार आहेत. पहिल्या उपांत्य फेरीत स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबई संघाचा सामना बडोद्याशी होणार आहे, तर दिल्लीविरुद्ध मध्य प्रदेश यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना होईल.श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबईने SMAT 2024 च्या या हंगामात दोनवेळा दोनशेहून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करून विक्रम रचला होता. पण, कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली बडोद्याने हार्दिकच्या जोरावर मैदान गाजवले आहे. त्यामुळे Mumbai vs Baroda सामन्यात भारतीय संघातील स्टार समोरासमोर उभे ठाकणार आहेत.