Smriti Mandhana becomes the third Indian after Rohit Sharma and Virat Kohli to score 4000 runs in T20Is
esakal
Smriti Mandhana historic achievement in T20 cricket: वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळातून बाहेर पडत स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप विजयानंतरच्या पहिल्याच ट्वेंटी-२० मालिकेत श्रीलंकेवर पहिल्या सामन्यात विजय मिळवला. भारताने ८ विकेट्स राखून सामना जिंकताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात जेमिमा रॉड्रीग्ज अर्धशतकी खेळीने चमकली असली तरी चर्चा स्मृतीच्या विक्रमाचीच राहिली. विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त असा पराक्रम करणारी स्मृती तिसरी भारतीय आहे.