Smriti Mandhana celebrates record-breaking 50-ball century, surpassing Virat Kohli’s fastest ODI hundred for India.
esakal
Smriti Mandhana fastest ODI century for India men or women : भारताच्या स्मृती मानधनाने दिल्लीचे मैदान गाजवले. ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावताना स्मृतीने अनेक विक्रम मोडले आणि त्यात विराट कोहलीच्या ( Virat Kohli) विक्रमाचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियाच्या ४१२ धावांच्या प्रत्युत्तरात स्मृतीने ६३ चेंडूंत १७ चौकार व ५ षटकारांसह १२५ धावांची वादळी खेळी केली. तिच्या या खेळीने तिला भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये वेगवान शतक झळकावणाऱ्या खेळाडूचा मान मिळवून दिला.