INDW vs ENGW : लढूनही हरल्या...! वर्ल्ड कपमधील पराभव स्मृती मानधनाच्या जिव्हारी लागला; अश्रू आलेच होते, पण...

India vs England Women’s World Cup 2025 match: महिला वर्ल्ड कप सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. २८९ धावांचा पाठलाग करताना स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर या जोडीने १२५ धावांची भागीदारी करत भारताला विजयाच्या जवळ नेलं होतं, पण...
Smriti Mandhana’s tears after the loss to England

Smriti Mandhana’s tears after the loss to England

esakal

Updated on

India chances of SF qualifying in ICC Women’s World Cup 2025 : भारतीय महिला संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान अडचणीत आले आहे. पहिल्या दोन लढती जिंकल्यानंतर त्यांना पुढील तीन सामन्यांत हार पत्करावी लागली. काल इंग्लंडविरुद्ध तर त्यांना हाता तोंडाशी आलेला घास गमवावा लागला. इंग्लंडच्या २८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मानधना व कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी दमदार खेळ केला. पण, या दोघी माघारी परतल्या आणि भारताला ४ धावांनी हार पत्करावी लागली. संघाच्या विजयासाठी सर्वकाही करूनही झालेली हार पाहून स्मृतीला अश्रू अनावर झाले होते, परंतु तिने स्वतःला सावरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com