Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Smriti Mandhana Tops ICC ODI Batting Rankings : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना पुन्हा एकदा आयसीसी महिला वन डे क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत स्मृतीने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.
Smriti Mandhana ICC No.1 ODI batter ranking 2025

Smriti Mandhana ICC No.1 ODI batter ranking 2025

esakal

Updated on

Smriti Mandhana ICC No.1 ODI batter ranking 2025 : भारताच्या महिला संघातील ओपनर स्मृती मानधना हिने आयसीसीच्या ताज्या वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी स्मृतीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात स्मृतीने अर्धशतकीय खेळी केली होती. त्याचाच फायदा तिला ताज्या क्रमवारीत झाला. तिने इंग्लंडची कर्णधआर नॅट शिव्हर ब्रंटला मागे सोडले. स्मृतीचे रेटिंग पॉइंट ७३५ झाले आहेत. अव्वल दहामध्ये स्मृती एकमेव भारतीय खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाच्या चार, इंग्लंडच्या दोन, तर दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिजच्या प्रत्येकी एक खेळाडू या यादीत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com