

Smriti Mandhana Women's T20 World Cup India vs Pakistan
Sakal
India vs Pakistan, Women's T20 World Cup 2026: महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत रविवारी (१४ जून) भारत आणि पाकिस्तान (IND W vs PAK W) संघात बर्मिंगहॅमला सामना होत आहे. या सामन्यात स्मृती मानधनाच्या (Smriti Mandhana) अर्धशतकाच्या आणि ऋचा घोषच्या (Richa Ghosh) स्फोटक फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानविरुद्ध भारताने १७१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. स्मृती मानधनाचे शतक विक्रमीही ठरले.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, भारताची सुरुवात खराब झाली होती. शफली वर्मा आणि स्मृती मानधना सलामीला फलंदाजीला उतरल्या. शफालीने षटकारासह सुरुवात केली, पण ती पहिल्याच षटकात मुनीबा अलीच्या हातात झेल देत बाद झाली. तिला सादिया इक्बालने बाद केले.