

विवाहापूर्वी होत असलेल्या हळदीसह अन्य कार्यक्रमांना भरघोस प्रतिसाद मिळत असून कुटुंबीयांसोबतच महिला क्रिकेटपटू आणि पाहुणेही या आनंदसोहळ्यात सहभागी झाले आहेत.
esakal
Smriti Mandhan wedding Sangli : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि सांगलीची लाडकी कन्या स्मृती मानधना हिचा विवाहसोहळा तिचे मूळ गाव असलेल्या सांगलीत उत्साहात पार पडत आहे. विवाहापूर्वी होत असलेल्या हळदीसह अन्य कार्यक्रमांना भरघोस प्रतिसाद मिळत असून कुटुंबीयांसोबतच महिला क्रिकेटपटू आणि पाहुणेही या आनंदसोहळ्यात सहभागी झाले आहेत. स्मृती मानधनाच्या लग्नाच्या तयारीसह अन्य कार्यक्रमांचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. याची जोरदार चर्चा रंगली आहे.