IND vs SL, 2nd Test: भारताला नडलेल्या सोनल दिनूशाचे दोन शतकांसह मोठे विक्रम! बीसीसीआय उपाध्यक्ष तर म्हणाले, 'हा तर तेंडुलकरसारखा'

Sonal Dinusha Smashes Records with 2 Centuries: भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश मिळाले. या सामन्यात दोन शतके करणाऱ्या सोनल दिनूशाने खास विक्रमही केला. त्याचे बीसीसीआय उपाध्यक्षांनीही कौतुक केले.
Sonal Dinusha | Sri Lanka vs India 2nd Test

Sonal Dinusha | Sri Lanka vs India 2nd Test

Sakal

Updated on

Sri Lanka vs India 2nd Test, Marathi News: भारत विरुद्ध श्रीलंका संघात कोलंबोमध्ये कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना झाला. हा सामना गुरुवारी (२७ ऑगस्ट) अनिर्णित राहिला. या सामन्यात भारतीय संघाच्या आणि विजयाच्या मध्ये श्रीलंकेचा सोनल दिनूशा (Sonal Dinusha) उभा राहिला.

त्याने दोन्ही डावात शानदार खेळ करत शतके केले. त्याने पाचवा दिवस तर श्रीलंकेच्या तळातील फलंदाजांना साथीला घेत संपूर्ण दिवस खेळून काढला. विशेष म्हणजे या सामन्यात भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिला होता. पण असे असतानाही श्रीलंकेने हा सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवले आहे.

Sonal Dinusha | Sri Lanka vs India 2nd Test
IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com