

Sourav Ganguly reveals Champions Trophy 2025 top 4 favourites: भारतीय संघाचा माजी कर्णधार व बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली याने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी जेतेपदाच्या शर्यतीसाठी ४ संघांमध्ये चुरस रंगणार असल्याची भविष्यवाणी केली. १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि हायब्रिड मॉडेलनुसार भारताचे सर्व सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. भारताला अ गटात स्थान दिले गेले आहे आणि त्यांच्यासमोर साखळी फेरीत पाकिस्तान, न्यूझीलंड व बांगलादेश यांचे आव्हान असणार आहे.