

South Africa vs New Zealand
Sakal
टी-२० विश्वकरंडकातील ड गटामधील वर्चस्वाची लढाई आज (ता. १४) पाहायला मिळणार आहे. दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड यांच्यामध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर लढत होणार असून दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन लढती जिंकून ‘सुपर एट’ फेरीच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
ड गटामध्ये पहिल्या क्रमांकाचा संघ कोण ठरणार, या प्रश्नाचे उत्तर या लढतीच्या निकालानंतर मिळण्याची शक्यता आहे. यामुळे या लढतीकडे गटातील नंबर वनची लढाई म्हणूनही बघितले जात आहे.