Group D points table after UAE vs Canada match
ESAKAL
T20 World Cup Canada vs United Arab Emirates Marathi News : कॅनडा विरुद्ध युनायटेड अरब अमिराती यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ड गटातील सामना रोमहर्षक राहिला. कॅनडाच्या १५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईची गाडी रुळावरून घसरली होती, परंतु आर्यांश शर्मा ( Aryansh Sharma) आणि सोहैब खान ( Sohaib Khan) यांच्या अर्धशतकी खेळीने यूएईला थरारक विजय मिळवून दिला. त्यापूर्वी जुनैद सिद्धीकने पाच विकेट्स घेत कॅनडाला धक्के दिले होते आणि विक्रमाला गवसणी घातली.