South Africa’s Lower Order Stuns Pakistan, Turns 235/8 into 404 All Out
esakal
South Africa lower order comeback vs Pakistan in Karachi Test : पाकिस्तानच्या गोलंदाजांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या फळीला झटपट बाद केले. ३३३ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेने २३५ धावांवर ८ विकेट्स गमावल्या. पाकिस्तानचे खेळाडू आघाडी मिळेल म्हणून आनंदात होते, परंतु केशव महाराज, सेनुरन मुथूसामी आणि कागिसो रबाडा ( Kagiso Rabada) यांनी पाकिस्तानी गोलंदाजांना रडवले. या तिघांनी शेवटच्या दोन विकेटसाठी १६९ धावा जोडताना आफ्रिकेला आघाडी मिळवून दिली. पाकिस्तानच्या खेळाडूंना माना खाली करून ड्रेसिंग रुममध्ये परतावे लागले.