

South Australia vs Tasmania in Sheffield Shield: क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत अनेक रोमांचक सामने झाले आहेत. त्यात आता आणखी एका सामन्याची भर पडली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सध्या शेफिल्ड शिल्ड ही देशांतर्गत स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत साऊथ ऑस्ट्रेलिया संघाने तास्मानिया संघाविरुद्ध थरारक सामना जिंकला.
प्रथम श्रेणीच्या या सामन्यात साऊथ ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. हा सामना तास्मानियाला अनिर्णितही राखता आला असता, मात्र अखेरच्या चेंडू नाट्यपूर्ण ठरला आणि सामना साऊथ ऑस्ट्रेलियाने २ धावांनी जिंकला.